नमस्कार! या भागात आपण शुभ आणि अशुभ ग्रह या विषयी माहिती घेणार आहोत. ज्या ग्रहांविषयी आपण माहिती घेतली आहे त्यामधील काही ग्रह शुभ आणि काही ग्रहांना पापी ग्रह म्हटले जाते.
चंद्र , बुध, शुक्र, गुरू शुभ ग्रह आहे.
सुर्य, मंगळ, शनी, राहू, केतू चंद्र आणि बुध या ग्रहांना नेहमी शुभ मानले जात नाही. पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमाच्या जवळचा चंद्र शुभ मानला जातो तर, अमावास्याच्या जवळचा चंद्र शुभ मानला जात नाही. याच प्रकारे बुध जर शुभ ग्रहांसोबत असेल तर शुभ असतो आणि जर पापी ग्रहांच्या सोबत असेल तर तो पापी होऊन जातो.
शुभ आणि पाप ग्रहांचे फलादेशात खूप महत्व आहे. ही लक्ष ठेवण्याची गरज आहे की, पापी ग्रह सदैव वाईट फळ देत नाही आणि सर्व शुभ ग्रह सदैव शुभ फळ देत नाही. चांगले किंवा वाईट फळ इतर गोष्टींवर निर्भर असते जसे ग्रहांचे स्वामित्व, ग्रहांची राशी स्थिती, दृष्टी आणि दशा इत्यादी वर निर्भर करते ज्याची चर्चा आपण पुढे करूया.
नमस्कार